नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे, दहावी पास लाडक्या बहिणी व भावांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. आपल्या भारतीय डाक विभागाअंतर्गत तब्बल 21,413 रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे. या भरती अंतर्गत ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक या पदांची भरती करण्यात येणार आहे.
ग्रामीण डाक सेवक भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. जर तुम्ही भारतीय डाक विभागांमध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही खूपच महत्त्वाची भरती आहे. यासाठी कोणताही दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज सादर करू शकतो. सदर भरती मध्ये उमेदवारांचे निवड ही दहावी इयत्ता मध्ये मिळालेल्या मार्काच्या आधारे करण्यात येते.
कुठल्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत सदर भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये घेण्यात येत नाही. त्यामुळे ज्या उमेदवारांना परीक्षा व मुलाखत देण्यास आवडत नसेल त्यांनी या भरतीसाठी नक्कीच अर्ज सादर करावा. अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे वय 3 मार्च 2025 रोजी किमान 18 तर कमाल 40 वर्षापर्यंत असावे.
शासकीय नियमानुसार एससी/ एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्ष तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्ष सुटदेखील देण्यात आलेली आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असून अर्ज सादर करत असताना तुम्ही दिलेल्या प्राधान्य क्रमानुसारच तुम्हाला नियुक्ती देण्यात येते.
या भरतीचे अर्ज 12 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाईन भरणे सुरू झालेले असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 आहे. ऑनलाइन अर्ज सादर करत असताना अर्ज मध्ये काही चुका झाल्या असल्यास उमेदवार ६6 मार्च ते 8 मार्च या कालावधी दरम्यान अर्ज संपादित करू शकतात.
अर्ज सादर करत असताना जनरल, ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील पुरुष उमेदवार व सर्व महिला उमेदवार यांसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही आहे.
महिला उमेदवारांसाठी कुठल्याही प्रकारची फी नसल्याकारणाने लाडक्या बहिणींनी या भरतीसाठी आवर्जून अर्ज सादर करावा. अधिकृत जाहिरातीची लिंक ही खाली देण्यात आलेले आहे. तसेच उमेदवार अधिकृत वेबसाईट https://indiapostgdsonline.gov.in/ वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज सादर करू शकतो.
तसेच जर तुम्हाला आमच्याकडून ऑनलाईन अर्ज भरून घ्यावयाचा असेल तर पुढील whatsapp क्रमांक वर मेसेज करा: 8372848484
मित्रांनो विना परीक्षा व व विना मुलाखती द्वारे शासकीय नोकरी मिळवण्यासाठी हि खूपच महत्वाची भरती आहे. या भरतीलाच आपण जीडीएस भरती असे देखील म्हणतो. त्यामुळे तुमच्या दहावी पास असणाऱ्या सर्व मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा व अशाच अपडेट साठी पुढील लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.