Gramin Dak Sevak Document Required: नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गव्हाणे. मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल कि आत्ताच भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 21,413 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
सदर भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 मार्च 2025 आहे. जर तुम्हालाही पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती साठी अर्ज सादर करावयाचा असेल तर तुमच्या कडे कोणकोणती कागदपत्रे फॉर्म भरतेवेळी जवळ असावीत याची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे.
हि माहिती वाचल्यानन्तर तुम्ही यशस्वीरीत्या कुठलीही चूक न करता तुमचा अर्ज वेळेत दाखल करू शकणार आहे. ऑनलाईन अर्ज फॉर्म भरण्याचा व लेख लिहिण्याचा मला 5 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे.
Gramin Dak Sevak Document Required: ऑनलाईन अर्ज भरत असताना तुमच्या कडे पुढील कागदपत्रे हवीत.
- 10वी चे गुणपत्रक/ प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- सही
वरील 3 कागदपत्रे तुमच्या जवळ असतील तरच तुम्ही फॉर्म भरू शकता.
ऑनलाईन अर्ज मध्ये भरावी लागणारी माहिती
- मोबाइल क्रमांक
- ई-मेल आयडी
- स्वतःचे नाव (10वी मार्कशीट वर असेल त्या प्रमाणेच)
- वडील अथवा आईचे नाव
- जन्मदिनांक
- आधार क्रमांक
- संपूर्ण पत्ता
- 10वीचे विषयानुसार मार्क्स
- जात प्रवर्ग
- पोस्ट प्रेफरेन्स
मित्रांनो फॉर्म भरतेवेळी तुम्हाला वरील माहिती विचारली जाते त्यामुळे फॉर्म भरण्यास सुरुवात करण्याआधीच हि माहिती तुम्ही स्वतःजवळ गोळा करून ठेवा. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म स्वतः सुद्धा भरू शकता. लिंक मी खाली देत आहे. तसेच आमच्याकडून अर्ज भरून घेवयाचा असल्यास 8372848484 या व्हाट्सअँप क्रमांकावर मेसेज करा.