बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक उत्तर तालीका अशी बघा: BMC Inspector Response Sheet 2024

BMC Inspector Response Sheet 2024: मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेने निरीक्षक पदाच्या परीक्षेचे रिस्पॉन्स शीट जारी केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत रिक्त असणाऱ्या निरीक्षक पदांचे भरती करण्याकरिता 10 ऑक्टोबर 2024 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

एकूण 178 पदांची भरती करण्याकरिता हे परीक्षा घेण्यात आली आहे. बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी उमेदवारांच्या लॉगिन मध्ये रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

परीक्षा दिलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपल्या खात्यात लॉगिन करून रिस्पॉन्स शीटची पीडीएफ डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली रिस्पॉन्स शीट डाउनलोड करता येणार आहे.

लॉगिन करण्यासाठी उमेदवाराला स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड माहिती असणे गरजेचे आहे. रिस्पॉन्स शीट वर काही आक्षेप नोंदवायचा असल्यास उमेदवार 25 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदवू शकतात.

बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक भरती रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करण्याची प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक भरती 2024 ची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

  1. उमेदवाराने सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html
  2. आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिलेले ठिकाणी भरा.
  3. निळ्या अक्षरात दिसणाऱ्या लॉगिन या बटनावर क्लिक करा.
  4. आता तुम्हाला रिस्पॉन्स शीट लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  5. तुमची रिस्पॉन्स चेक तुमच्या स्क्रीनवर दिसेल उजव्या कोपऱ्यातील प्रिंट या बटनावर क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करा.

BMC निरीक्षक उत्तर तालीका लिंक: BMC Inspector Response Sheet 2024 Link

अधिकृत वेबसाईटmcgm.gov.in
रिस्पॉन्स शीट क्लिक करा
BMC क्लर्क भरतीक्लिक करा